मारहाणीत महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:06 IST2019-02-28T00:06:17+5:302019-02-28T00:06:32+5:30

अमळनेर : चारित्र्यावर नेहमी संशय घेता म्हणून पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केल्याने महिला ...

Hurt woman injured | मारहाणीत महिला जखमी

मारहाणीत महिला जखमी

अमळनेर : चारित्र्यावर नेहमी संशय घेता म्हणून पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केल्याने महिला जखमी झाली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सोनू लोंढे व संजय सोनू लोंढे हे दोघे चंदाबाई शिवा लोंढे रा. गांधलीपुरा अमळनेर हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत वाद घालायचे. त्यामुळे सबंधित महिलेने अमळनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात धाव घेतल्याचा राग आल्याने २६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चौधरी गल्लीत फिर्यादी महिलेस अडवून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली तर संजय लोंढे यांच्या सांगण्यावरून विजय लोंढे याने महिलेच्या डोक्यात लाकडी काठीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करीत आहेत.

Web Title: Hurt woman injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव