जामनेरला व्यापारी संकुलाच्या बांधकामाविरोधात मातंग समाज बांधवांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:52 PM2018-01-22T16:52:06+5:302018-01-22T16:57:04+5:30

मातंग समाजाच्या जागेवर नगरपालिकेकडून होत असलेल्या व्यापारी संकुल बांधकामाच्या विरोधात सोमवारी पालिका कार्यालयासमोर समाज बांधवांनी लाक्षणिक उपोषण केले.

The hunger strike of the Matang Samaj community against the construction of Jamnar business complex | जामनेरला व्यापारी संकुलाच्या बांधकामाविरोधात मातंग समाज बांधवांचे उपोषण

जामनेरला व्यापारी संकुलाच्या बांधकामाविरोधात मातंग समाज बांधवांचे उपोषण

Next
ठळक मुद्देमातंग समाजाच्या जागेवर नगरपालिकेकडून व्यापारी संकुल बांधकामसमाज मंदिराचे बांधकाम करावे अशी समाजबांधवाची मागणीसफाई कर्मचाºयांना अरेरावी केल्याचा आरोप करीत निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर, दि.२२ : मातंग समाजाच्या जागेवर नगरपालिकेकडून होत असलेल्या व्यापारी संकुल बांधकामाच्या विरोधात सोमवारी पालिका कार्यालयासमोर समाज बांधवांनी लाक्षणिक उपोषण केले.
भुसावळ रस्त्यावरील मटन मार्केटला लागून असलेली जागा समाजाची वडीलोपार्जीत जागा आहे. या ठिकाणी समाज मंदीराचे बांधकाम करावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून समाजाकडून केली जात आहे. याच मागणीसाठी शनिवारी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन झाले. पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी सफाई कर्मचाºयास अरेरावी केल्याचा आरोप करुन त्यांचे विरोधात निदर्शने करण्यात आली.
सुनील बावस्कर व जीवन बिºहाडे यांनी सोमवारी या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी समाज बांधवांसह काँग्रेसचे शंकर राजपुत, राष्ट्रवादीचे पप्पु पाटील, प्रल्हाद बोरसे, नरेंद्र जंजाळ, शिवसेनेचे भरत पवार, संभाजी ब्रिगेडचे मनोज महाले, प्रदीप गायके सहभागी झाले होते.

Web Title: The hunger strike of the Matang Samaj community against the construction of Jamnar business complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.