अभिवाचन स्पर्धेला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:05+5:302021-09-07T04:21:05+5:30
यात देश-विदेशातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत सुमारे २५० स्पर्धकांनी भाग घेतला. झूम मीटिंगच्या स्वरूपात या स्पर्धेचा ...

अभिवाचन स्पर्धेला उदंड प्रतिसाद
यात देश-विदेशातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत सुमारे २५० स्पर्धकांनी भाग घेतला. झूम मीटिंगच्या स्वरूपात या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यास सर्व स्पर्धकांसोबतच इनरव्हीलच्या अखिल भारतीय पातळीवरच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, असोसिएशनच्या पदाधिकारी डॉ. रश्मी शर्मा, विविध भारतीच्या सर्वोत्कृष्ट उद्घोषिका ममता सिंग, वीणा स्वामी आणि मीनल लाठी उपस्थित होत्या.
परीक्षक म्हणून वीणा स्वामी (चित्रदुर्ग) यांनी इंग्रजी, ममता सिंग यांनी हिंदी आणि सुनीता घाटे व प्रमोद लिमये यांनी मराठी भाषेतील प्रवेशिकांचे परीक्षण केले. स्पर्धेत पूजा बवले (मराठी), अनघा रत्नपारखी (हिंदी) आणि मालिनी हेब्बर (इंग्रजी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन जुलेखा शुक्ल आणि विकास शुक्ल यांनी केले. सुरुवातीला दीपिका कटारिया यांनी प्रार्थना सादर केली.
इनरव्हील चाळीसगावच्या अध्यक्ष सीमा शर्मा यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. नीता सामंत यांनी आभार मानले.