डोंगर कठोरा येथे खळ्यास भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:59+5:302021-07-15T04:12:59+5:30

डोंगर कठोरा, ता. यावल : शेतकऱ्याच्या खळ्यास आग लागून म्हशींचे तीन पारडू होरपळून ठार झाले तर चार पारडू गंभीररित्या ...

A huge fire broke out at the hillside | डोंगर कठोरा येथे खळ्यास भीषण आग

डोंगर कठोरा येथे खळ्यास भीषण आग

डोंगर कठोरा, ता. यावल : शेतकऱ्याच्या खळ्यास आग लागून म्हशींचे तीन पारडू होरपळून ठार झाले तर चार पारडू गंभीररित्या भाजले. यात कडबा, कुट्टी व इतर साहित्यही जळून खाक झाले. ही घटना डोंगर कठोरा येथे सकाळी ८.३० वाजता घडली.

युवराज गणपत भिरुड यांच्या खळ्यात आगीची ही घटना घडली. सकाळी अवचित पाटील व विजय जंगले यांना या खळ्याजवळ धूर दिसला. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील लोकांना बोलावले. तोपर्यंत खळ्यातील शेतीपयोगी साहित्य यामध्ये कडबा, कुट्टी हे जळून खाक झाले तसेच म्हशीच्या तीन पारडूंचा होरपळून मृत्यू झाला व म्हशीचे चार पारडू गंभीर जळाले. दोन गाईसुद्धा आगीमध्ये जखमी झाल्या आहेत. ग्रामस्थांचे प्रयत्न व सतर्कतेमुळे आजूबाजूच्या खळ्याचे तसेच पशुधनाला नुकसान झाले नाही. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

घटनास्थळी सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, तलाठी वसीम तडवी, ग्रामविकास अधिकारी सी. जी. पवार, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. सी. भगुरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. के. डी. बावस्कर,डॉ. सुरेश सोनवणे, लोटू धनगर, ग्रा.पं. सदस्य मनोहर महाजन, जुम्‍मा तडवी, कोतवाल विजय आढाळे, ग्रा.पं. कर्मचारी प्रदीप पाटील, कलेश कोल्हे तसेच ग्रामस्थ आदींनी मदतकार्य केले.

फोटो ओळी : डोंगर कठोरा येथे खळ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे झालेले नुकसान. (नितीन झांबरे)

Web Title: A huge fire broke out at the hillside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.