हावडा, गीतांजलीसह इतर गाड्या आज विलंबाने धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:53+5:302021-03-04T04:27:53+5:30
जळगाव : भुसावळ ते भादली दरम्यान गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ...

हावडा, गीतांजलीसह इतर गाड्या आज विलंबाने धावणार
जळगाव : भुसावळ ते भादली दरम्यान गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे हावडा, गीतांजली, गोवा यासह इतर सुपरफास्ट रेल्वे गाड्या दोन ते अडीच तासापर्यंत विलंबाने धावणार आहेत, यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनातर्फे भुसावळ ते जळगाव दरम्यान महामार्ग विस्तारिकरणाचे काम सुरू असून, भादलीच्या पुढे रेल्वे ट्रकच्या वर वाहनासांठी उड्डाणपुल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी महामार्ग प्रशासनातर्फे रेल्वेच्या मदतीने गर्डर टाकण्यात येणार आहेत. यासाठी साधारणत: या कामासाठी अडीच तासांचा कालावधी लागणार असून, यामुळे जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी एक या दरम्यान होणाऱ्या कामामुळे या वेळेतील गाड्या विलंबाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्या जळगाव, शिरसोली, पाळधी या ठिकाणी थांबविण्यात येणार आहेत. यामध्ये डाऊनचा अहमदाबाद हावडा जळगाव स्टेशनवर दोन तास थांबविण्यात येणार आहे.तसेच डाऊनची अहमदाबाद बरौनी एक्स्प्रेस दोन तास पाळधीला थांबविण्यात येणार आहे. तर मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस शिरसोली स्टेशनवर एक तास तर गोवा एक्स्प्रेसही म्हसावद स्टेशनला पाऊण तास थांबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
इन्फो :
३६ मीटरचे एकूण तीन गर्डर टाकण्यात येणार
जळगाव ते भुसावळ हा महामार्ग लांबीला ३६ मीटरचा असल्याने, तितक्या ३६ मीटरचे या ठिकाणी एकूण तीन गर्डर टाकण्यात येणार आहे. ९० टन क्षमतेचा एक गर्डर असून, हे गर्डर टाकण्याच्यासाठी बाहेरून अत्यानुधिक क्रेन मशिन मागविण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीने गर्डर टाकण्यासाठी सर्व तयारी झाली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (नही) चे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी सांगितले.