शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:40 PM

पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़

ठळक मुद्देचोरट्यांनी लांबविला लाखाचा ऐवजअज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखलरामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़ याबाबत घरमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़धन्नाराम प्रजापत हे पत्नी किरणदेवी, दोन मुलं तसेच एक मुलगी व भाऊ ताराचंद यांच्यासह पिंप्राळा येथील विद्यानगरात वास्तव्यास आहेत़ धन्नाराम यांचा मार्बलचा व्यावसाय आहे़ पत्नी किरणदेवी व मुले व मुलगी हे नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले असल्यामुळे धन्नाराम व ताराचंद हे दोघे भावंड घरीच आहेत़ त्यामुळे नेहमी प्रमाणे दोघे सकाळी ९ वाजता दादावाडी येथील मार्बलच्या दुकानावर घराला कुलूप लावून निघाले़ याच दरम्यान चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत भरदिवसा घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत आत प्रवेश केला़ कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोकडवर डल्ला मारीत चोरटे पसार झाले़दुपारी ४ वाजता ताराचंद हे कपडे व इतर साहित्य घरी ठेवण्यासाठी आले़ तेव्हा त्यांना कडी-कोयंडा तुटलेले दिसून आले़ घरात आत जाऊन पाहिल्यानंतर सामान फेकलेले होते़ तर कपाट देखील फोडलेले होते़ त्यातील दागिने व रोकड चोरीला गेल्याचे दिसले़ याबाबत त्यांनी लागलीच भाऊ धन्नाराम यांना कळविले़ व सायंकाळी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली़

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा