जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 18:13 IST2018-03-30T18:13:33+5:302018-03-30T18:13:33+5:30

सोनाळा येथील रहिवासी संतोष रामदास पाटील यांच्या घरात शुक्रवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

A house fire due to a short circuit in Sonala in Jamnar taluka | जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

ठळक मुद्देआगीत संसारपयोगी साहित्य जळून खाकबचत गटांकडून घेतलेली ३० हजारांची रक्कम जळून खाकमहसूल व पोलिसांनी केला आगीचा पंचनामा

आॅनलाईन लोकमत
पाळधी ता. जामनेर,दि.३० : येथून जवळ असलेल्या सोनाळा येथील रहिवासी संतोष रामदास पाटील यांच्या घरात शुक्रवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत गुरुवारी बचत गटमधून आणलेले ३० हजार रुपये जळाले.
सोनाळा येथील रहिवासी संतोष रामदास पाटील यांचा घरात शुक्रवारी सकाळी ९ वाजे च्या सुमारास घरात कोणीही नसतांना आग लागली. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच रोख रक्कम जळून खाक झाली.
आगीची घटना समजताच परिसरातील राहिवांशी नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली. परंतु तोपर्यंत घरातील सर्व सामान पूर्णता जळून खाक झाले होते. या आगीत फ्रिज, टी.व्ही, गहु , डाळ ५० किलो, तांदुळ, कपडे कुलर व इतर साहित्यासह नगदी ३० हजार एकुण अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले.

Web Title: A house fire due to a short circuit in Sonala in Jamnar taluka