हंप्या खूनप्रकरणातील आरोपीच्या घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 22:21 IST2020-10-05T22:21:33+5:302020-10-05T22:21:49+5:30

चर्चा : रिकामे होते घर, फिर्याद नाही

The house of the accused in the Hampya murder case was set on fire | हंप्या खूनप्रकरणातील आरोपीच्या घराला आग

हंप्या खूनप्रकरणातील आरोपीच्या घराला आग


भुसावळ : येथील भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या हत्याकांडातील आरोपी राज उर्फ मोहसीन अजगर खान यांच्या घराला सोमवार रोजी सकाळी आग लागील्याची घटना घडली .यासंदर्भात शहरात एकच चर्चा होती. शहर पोलीस ठाण्यात मात्र रात्री उशिरापर्यंत कुणीही तक्रार दिली नसल्यामुळे अकस्मात आगीची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत यांनी ‘लोकमत’ ला दिली.
कवाडे नगर मधील पंपिंग हाऊस जवळ राज उर्फ मोसिन खान यांचे वडील अजगर खान यांचे हे घर आह, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून हे घर रिकामे पडले आहे. घराच्या अवतीभवती झाडे-झुडपे उगली आहे. येथून वीज महामंडळांच्या तारा ही मोठ्या प्रमाणात गेल्या आहे. तर घराच्या जवळपास विजेचे आकडेही टाकण्यात आले आहे . घराला आग लागल्याच्या माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली . यासंदर्भात फियार्दीचा संपर्क होत नाही व कुणी फिर्याद देण्यासही सायंकाळपर्यंत पोलीस स्टेशनला आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The house of the accused in the Hampya murder case was set on fire