कोरोनाने काळ ठरलेल्या चोपड्यात हॉस्पीटल झाली रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 23:44 IST2021-05-19T23:44:34+5:302021-05-19T23:44:59+5:30
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात चोपडा शहर आणि तालुक्यात कोरोनाची दुसरी लहर ओसरलेली आहे. शहरातील सहा कोविड हॉस्पिटल हे पूर्णपणे रिकामी झाली आहेत.

कोरोनाने काळ ठरलेल्या चोपड्यात हॉस्पीटल झाली रिकामी
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : चोपडा तालुक्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने अक्षरश: कहर केला होता. यामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. सध्या मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात चोपडा शहर आणि तालुक्यात कोरोनाची दुसरी लहर ओसरलेली आहे. शहरातील सहा कोविड हॉस्पिटल हे पूर्णपणे रिकामी झाली आहेत. यामुळे तालुकावासीयांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
मार्च महिना आणि १९ एप्रिल पर्यंत चोपडा शहर आणि ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना ने थैमान माजविले होते. जवळपास १४ हजार ५०० रुग्ण बाधित झालेले आहेत. तर शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे कोरोना चाचणी अहवालात दररोज सहा ते पंधरा च्या आतच रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.
चोपडा तालुक्यात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयासह इतर पाच खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या सगळ्या हॉस्पिटलमध्ये सध्या सर्वसामान्य बेड, ऑक्सिजनयुक्त बेड, अतिदक्षता विभागातील बेड आणि व्हेंटिलेटर बेड असे सर्वच प्रकारचे बेड सध्या पूर्ण रिक्त झालेले आहेत.
परंतु सध्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने ज्यांना कोरोना झालेला नाही अशा नागरिकांमध्ये,लहान मुलांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा शहरात ६ हॉस्पिटल मध्ये एकूण रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४३२ बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ७७ रुग्ण उपचार घेत आहेत तर ३५५ बेड हे चोपडा तालुक्यात रिकामे आहेत.
दहा हजार अँटिजेन किट रुग्णालयाला सुपूर्द
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे नैसर्गिक ऑक्सिजन सयंत्र निर्मिती प्रकल्पाचा कामाला बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथील तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, अधीक्षक बोदवड अधिक्षक डॉ. मनोज चौधरी ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश पाटील, डॉ.अमित घडेकर, डॉ. प्रविण देशमुख, तालुका सुपरवायझर अर्जुन काळे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शहर प्रमुख गणेश टोंगे, विनोद माळी, उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी प्रशांत पाटील उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रमात ११ लाख रुपयाचे दहा हजार अँटीजेन किट खरेदी करून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय तसेच बोदवड व तालुक्यातील प्राथमिक उपचार केंद्र येथे किट सुपूर्द केले.