शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

‘नली : एक अव्यक्त विरहिणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:50 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये शरद धनगर यांनी, परिवर्तन निर्मित नली या एकल नाट्यकृतीचा घेतलेला आढावा.

आज मराठी रंगभूमीवर जुनं ते सोनं या युक्तीने जुनी नाटकं नवीन साज लेवून आपल्या भेटीस येत असतानाच ‘संगीत देवबाभळी’ आणि ‘हॅम्लेट’सारखी नाट्यकृती आपलं वेगळंपण घेऊन येत आहेत. याच नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील परंपरेला पुढं नेण्याचं काम खान्देशी नाट्यसृष्टीही करताना दिसते. ‘परिवर्तन जळगाव’चे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील आणि त्यांची टीम खान्देशी नाट्यक्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करत असतात, त्यातलीच एक कलाकृती म्हणजे ‘नली’.‘परिवर्तन जळगाव’निर्मित ‘नली’ ही एकल नाट्यकृती नुसती पाहायची नाही, तर अनुभवायची गोष्ट आहे. लेखक ‘श्रीकांत देशमुख’ लिखित ‘पडझड वाऱ्याच्या ‘भिंती’ या पुस्तकातील ‘नलिनी देवराव’ या व्यक्तीचित्रावर आधारित हा एकल नाट्यप्रयोग सर्वांगाने परिपूर्ण अशी कलाकृती आहे. ‘नली’ नावाचं हे पात्र महाराष्ट्रातील तमाम सोशित, पीडित ग्रामीण स्त्रियांचं प्रातिनिधिक रूप आहे.साधारणत: १९७०च्या दशकातली ही कथा आहे.‘नली’ म्हणजे सतत खळखळत, हसत, बागळत राहणाºया निर्झर झºयासारखी निर्मळ मुलगी. ‘बाळू’ आणि ‘नली’च्या उत्कट पण अव्यक्त प्रेमाची ही कहाणी. इयत्ता चौथीतली ही मैत्री खूप अल्लड पण तितकीच घट्ट आणि निष्पाप...ढे सातवीत येईपर्यंत बाळूच्या मनात ‘नली’विषयी अंकुरणार प्रेम... नलीचं चौथी नापास होणं, त्यातून होणारी त्यांची ताटातूट......नलीचं चौथीत नापास झाल्यावर अल्लड, निरागस पोरीतून एका बाईत होणारं परिवर्तन माणसाला अंतर्मुख करतं. तिच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात होणारे बदल हे मनाच्या तळाशी खोलवर चटके देऊन जातं आणि बेमालूमपणे प्रेक्षकांच्या डोळ्यात अलगद पाणी आणतं. बाळू गरीब कुटुंबातील कौटुंबिक जाणीव असलेला हुशार होतकरू युवक.शहरात जाऊन त्याचं शिक्षण घेणं. त्याच्या मनात नलीचं प्रेम तसूभरही कमी न होता उलट वृद्धिंगत होत जाणं. सुट्टीत गावी आल्यावर नलीला भेटण्यासाठी त्याची धडपड. असं सगळं होत असताना बाळूला नोकरी लागण. बाळूला आपलं मनातलं प्रेम व्यक्त करण्याची संधी असूनदेखील तो त्याला ते व्यक्त करता न येणं पुढे या भेटीची गावात होणारी चर्चा नलीची होणारी बदनामी व त्यातून एक दिवस अचानक गावातल्या एका स्वजातीय अशिक्षित व्यसनी मुलाशी नली लग्न होणं. येथूनच नलीचा खरा सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक संघर्ष सुरू होतो. शेती मातीत मोलमजुरी करून आपलं व आपल्या व्यसनी नवºयाचं पोट भरत गरिबीत जगणारी नली आपलं दु:ख, कुचंबना, कोंडमारा, हेळसांड, समाजाकडून होणारे चारित्र्यहनन, बदनामीविषयी कुठेच व्यक्त होत नाही आणि इथेच नलीविषयी वाटणारी सहानुभूती प्रेक्षक आपल्या वाहणाºया अश्रूतून व्यक्त करतो. शेवटी नली आत्महत्येसारखा मार्ग निवडते. नली आत्महत्या का करते? तिचं काय चुकलं?बाळूने त्याचं प्रेम व्यक्त केलं असतं तर हे टाळता आलं असतं का? नलीच्या आत्महत्येचा खरा दोषी कोण? सामाजिक परिस्थिती, बाळू की गरिबी? अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेत आपले डबडबले डोळे पुसत प्रेक्षक सभागृहाबाहेर पडतात. नाटकाच्या इतर बाबी सांगायच्या झाल्यास नाटकाचं पार्श्वसंगीत प्रसंगांना साजेसं आहे. नेपथ्य प्रकाशयोजनेचा अचूक जागी वापर केला आहे.योगेश पाटील या तरुण दिग्दर्शकाने आपलं काम चोख बजावलंय. एका व्यक्तीचित्रणाचं माध्यमांत एकल प्रयोगात इतक्या चपखल पद्धतीने केला आहे की, प्रेक्षक या नाट्यकृतीशी इतका एकरूप होऊन जातो की, तो स्वत:ला त्यातला एक भाग मानायला लागतो आणि याचं श्रेय दिग्दर्शक योगेश पाटीलबरोबरच हर्षल पाटील या तरुण नाट्यअभिनेत्याला विभागून देता येईल.हर्षल पाटील यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा व संवादाचा अचूक मेळ साधत नली आणि बाळू सोबत सगळीच पात्र म्हणजे अगदी बाळूचे मित्र, शाळेतला मास्तर, मारोतीच्या देवळात निरागस पोरींना प्रवेश नाकारणारा मसाजी देशमुखच्या रूपाने पुराणमतवादी वृत्तीचा मसाजी देशमुख इत्यादी पात्र अचूक उभी केलेली आहेत. ही नाट्यकृती पाहताना शालेय जीवनातील आपापल्या ‘नली’ आणि ‘बाळू’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अहिराणी व तावडी बोली भाषेतील संवाद खूपच परिणामकारक आहेत.आपल्या खान्देशी बोली भाषेचा लेहेजा, खान्देशी संस्कृती, परंपरा, म्हणी याचा गंधही या कलाकृतीच्या निमित्ताने अनुभवता येतो. एकपात्री आणि एकल यातला महत्त्वाचा फरक म्हणजे एकपात्री ही स्टेजवर एका जागी उभं राहून केला जातो व त्यात मिमिक्रीचा उपयोग करून एकच व्यक्ती सर्व व्यक्तीरेखा सादर करतो.मात्र एकल नाट्यप्रयोगात एकच व्यक्ती सर्वच व्यक्तीरेखा आपल्या अभिनय कौशल्य, शारीरिक हालचाली आणि संवाद यातून जिवंत करण्याचं काम करत असतो आणि हर्षल पाटील यांनी त्यांच्या अभिनयाने तो माहोल निर्माण केलाय.खान्देशची नाट्यपरंपरा फार पुरातन आहे. जळगावची परिवर्तन ही संस्था व शंभू पाटील आपल्या परीने ही नाट्य चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. आज खान्देशातील अनेक शहरात प्रशस्त नाट्यगृह उभारली आहेत पण तेथे एकही नाटक सादर होताना दिसत नाही. खान्देशी नाट्य चळवळीला पुन्हा चांगले दिवस आणायचे असतील तर खान्देशातील राजकीय नेते, नाट्य व सामाजिक संस्था तसेच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने योग्य दिशेने पावले उचलाय हवी.केवळ विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू करून चालणार नाही तर नाट्य कार्यशाळा, एकल, एकपात्री, नाट्यस्पर्धा, अभिवाचन स्पर्धांचं आयोजन केले पाहिजे.