भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:08 IST2018-12-14T16:06:49+5:302018-12-14T16:08:23+5:30
भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील वराडसीम येथे हातभट्टीवर तालुका पोलिसांनी धाड टाकून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तालुका ...

भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे हातभट्टीवर धाड
ठळक मुद्दे४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील वराडसीम येथे हातभट्टीवर तालुका पोलिसांनी धाड टाकून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वराडसीम येथील इंदिरानगरात ही कारवाई करण्यात आली. सहा ड्रममध्ये १२०० लीटर कच्चे रसायन, तसेच ३० लीटर तयार दारू असा ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना आढळला. आरोपी रमेश तुकाराम शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, फौजदार गजानन करेवाड, हर्षवर्धन सपकाळे, राजेंद्र पवार, राजू तायडे, अजय माळी, मोनी पाटील यांनी केली.