जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 19:06 IST2020-02-02T19:05:16+5:302020-02-02T19:06:26+5:30

पंचायत कार्यालयात रविवारी ‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील १४ स्वयंसेविकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Hope volunteers at Jamner | जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव

जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव

ठळक मुद्दे‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात सन्मानप्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

जामनेर, जि.जळगाव : पंचायत कार्यालयात रविवारी ‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील १४ स्वयंसेविकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गटविकास अधिकारी ईश्वर गोयर व सभापती सुनंदा पाटील यांनी स्मृतिचिन्हांचे वाटप केले. रेखा ठोसर, ज्योती पवार, छाया सोनवणे, गीता पाटील, सीमा राजपूत, सुनीता केणेकर, सुनीता राठोड, ज्योती पाटील, मोनाली चव्हाण, नसीम बानो सैयद, शीतल चौधरी, सोनूबाई तेली, वंदना सुरवाडे, मंगला चव्हाण यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
जि.प. सदस्य अमित देशमुख, उपसभापती एकनाथ लोखंडे, नीता पाटील, रवींद्र सूर्यवंशी, रमण चौधरी, डॉ.नरेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.राजेश सोनवणे यांनी, तर आभार डॉ.पल्लवी सोनवणे यांनी मानले.

Web Title: Hope volunteers at Jamner