रोटरी रॉयल्सतर्फे कर्तबगारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:08+5:302021-08-20T04:22:08+5:30

भुसावळ : येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सतर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सन्मान कर्तबगारांचा’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी ...

Honors from the Rotary Royals | रोटरी रॉयल्सतर्फे कर्तबगारांचा सन्मान

रोटरी रॉयल्सतर्फे कर्तबगारांचा सन्मान

भुसावळ : येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सतर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सन्मान कर्तबगारांचा’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी विविध उदाहरणे देऊन जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र सांगितला. लक्ष्य निश्चित केल्याशिवाय यश मिळत नाही, असे ते म्हणाले.

भुसावळ शहरातील कला सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कर्तबगारी दाखवणाऱ्या व्यक्तींचा तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या वर्गातील शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रोटरी हॉलमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी होते.

व्यासपीठावर रोटरी रॉयलचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर व सचिव ॲड. विनोद तायडे, प्रकल्पप्रमुख गणेश फेगडे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक उदिता कन्स्ट्रक्शनचे संचालक रोटेरियन भूपेंद्र शर्मा, रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळातील परीक्षा परिस्थितीवर मनोगत केले.

प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख गणेश फेगडे यांनी केले. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

रोटेरियन राजीव शर्मा यांनी क्लबमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन सदस्यांना रोटरीची पिन व प्रमाणपत्र देऊन त्यांना सदस्यत्व बहाल केले.

या कार्यक्रमात खालील व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील कामगिरीनुसार विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार, आरोग्याधिकारी प्रदीप पवार यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार तसेच महेश मुरलीधर चोपडे, मुकेश अग्रवाल, प्रवीण गडे व विनोद बबनराव उबाळे यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मशानभूमी कर्मचारी अरुण रंधे यांना मानवता पुरस्कार देण्यात आला, तर प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांना जीवरक्षक व डॉ. विक्रांत सोनार यांना जीवनदाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील व दिशा अतुल चौधरी यांना क्रीडागौरव पुरस्कार तर क्षितीज राजेश मानवतकर यांना यशवंत पुरस्कार व राजीव शर्मा यांना दातृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागर विसपुते यांना रक्तदाता पुरस्कार देण्यात आला. विशाखा सुनील शिंदे यांनी लुटारू मुलांच्या तावडीतून एका वृद्धाची सुखरूप सुटका केल्याबद्दल त्यांना शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. रमाकांत भालेराव यांना कलागौरव तर वीरेंद्र पाटील यांना नाट्यगौरव पुरस्कार, कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत अंजली रूनवे या दिव्यांग असूनही कार्यालयात पूर्णवेळ, प्रामाणिक सेवा केल्याबद्दल त्यांना धैर्य पुरस्कार तर वृक्षांचे संगोपन करून त्यांच्या नियमित वाढीकडे लक्ष देणारे नाना पाटील यांना वृक्षमित्र पुरस्कार, रणजितसिंग राजपूत यांना युवा वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व रोटेरियन मोहन पाटील, सी. जी. पवार, योगेश उबाळे, अनुपसिंग ठाकूर, प्रशांत सुतवणे, धीरज मुळे, अनंत वाटपाडे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Honors from the Rotary Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.