भुसावळात शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:34+5:302021-09-09T04:21:34+5:30
भुसावळ येथील राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे प्रभात फेरी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, नगरसेवक ...

भुसावळात शिक्षकांचा सन्मान
भुसावळ येथील राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे प्रभात फेरी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, नगरसेवक बोधराज चौधरी हे होते. यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार संजय सावकारे व बोधराज चौधरी यांनी डॉ. देवेंद्र वर्मा, प्रा. दिनेश राठी, निकेश अग्रवाल, डॉ. जे. पी. सुचीक, जगदीश शर्मा, द्विवेदी, मनोज माहेश्वरी, प्रा. डॉ. शुभांगी राठी, सीए संजीवनी लाहोटी, प्रकाश विसपुते आदी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी राधेश्याम लाहोटी, जी. आर. ठाकूर, संजय अग्रवाल, जे. बी. कोटेचा, डॉ. साधना शर्मा यांचे सहकार्य लाभले. प्रभात फेरी सदस्या ममता जांगीड यांचा डीआरएमद्वारा आयोजित मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक आल्याने त्यांना आमदार संजय सावकारे यांनी सन्मानित केले. राधेश्याम लाहोटी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील लाहोटी यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन - गुणवंत शिक्षकांसोबत आमदार संजय सावकारे, बोधराज चौधरी, राधेश्याम लाहोटी, जी. आर. ठाकूर आदी. (छाया - श्याम गोविंदा) ०९/८