हिरण विद्यालयात गुणवंतांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:29+5:302021-08-22T04:19:29+5:30

कजगाव, ता. भडगाव : ब. ज. हिरण विद्यालयात १० व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महात्मा ...

Honoring the meritorious in Hiran Vidyalaya | हिरण विद्यालयात गुणवंतांचा सन्मान

हिरण विद्यालयात गुणवंतांचा सन्मान

कजगाव, ता. भडगाव : ब. ज. हिरण विद्यालयात १० व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील, सचिव रत्ना पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक धर्मसिंग पाटील, स्वनिल पाटील, सुनील पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. दहावीच्या वर्गातून प्रथम आलेला चैतन्या मनोज पाटील तर द्वितीय क्रमांकाने आलेल्या साक्षी प्रदीप पाटील, तृतीय क्रमांकाने आलेल्या साक्षी परमेश्वर पाटील व मिलिंद अशोक महाजन व १२ वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या रिंकू विजय पाटील, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या लक्ष्मी विजय साठे व तृतीय आलेला प्रशांत अशोक सोनवणे यांचा सन्मान केला. आभार एस. एस. केदार यांनी मानले.

Web Title: Honoring the meritorious in Hiran Vidyalaya