Honor of Pachoria's Music Lad | पाचोऱ्याच्या संगीता लाड यांचा सन्मान

पाचोऱ्याच्या संगीता लाड यांचा सन्मान

पाचोरा, जि.जळगाव : येथील संगीता राजेंद्र लाड यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न हा पुरस्कार देण्यात आला. समाजकल्याणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह देऊन गौरव पत्रात करण्यात आला आहे.
आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश सरनाईक, अभय सहस्रबुद्धे, कीर्तनकार भगवान महाराज कोकरे, अभिनेते प्रफुल्ल गावस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००९ पासून आदिशक्ती श्री कानबाई माता यांचे शास्त्रोक्त पूजाविधी व गीतगायन करण्याचे काम त्या करतात. विविध भक्तीगीतांचे लेखन करणे, त्या गीतांना चाल लावून त्या भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या भक्तीगीतांच्या दोन पुस्तकांचे लेखन व प्रकाशन झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील आदिशक्ती, सोळा कुलस्वामिनी मातांचे, शास्त्रशुद्ध पूजाविधी करणे, भक्ती गीतगायन करणे असे उपक्रम त्या राबवित आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

Web Title:  Honor of Pachoria's Music Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.