भडगावात आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:26+5:302021-09-07T04:20:26+5:30
भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भडगावमार्फत शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील आदर्श व गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा पार पडला. यावेळी समीर जैन, ...

भडगावात आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान
भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भडगावमार्फत शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील आदर्श व गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी समीर जैन, ग.स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील, केंद्रप्रमुख रवींद्र सोनवणे, एन. एस. पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, नीलेश मालपुरे व जिल्हा समन्वयक स्वप्नील निकम व नेहा मालपुरे यांनी उपस्थिती दिली. यावेळी कमलेश शिंदे, उज्ज्वला पाटील, डी. डी. महाजन, कृष्णा पाटील, रणजित सोनवणे, सर्जराव चव्हाण, ललित पाटील, नयना कापुरे, दीपक बोरसे व वैशाली शिंदे ह्यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भडगाव तालुक्यातील अध्यक्ष प्रतीक पाटील, मुख्य सचिव अश्विनी सोमवंशी, सचिव प्रतीक्षा सोनवणे, समन्वयक अर्चना पाटील, कृष्णा भोसले, प्रेरणा पाटील यांनी कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला.
060921\06jal_4_06092021_12.jpg
भडगाव येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर व पुरस्कारप्राप्त शिक्षक, शिक्षिका.