लॉकडाऊन काळात भुसावळ व जळगाव डाक विभागातर्फे ग्राहकांना घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:43 IST2020-08-10T14:42:08+5:302020-08-10T14:43:02+5:30
लॉकडाऊन काळात डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ व जळगाव प्रधान डाकघर व विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊन काळात भुसावळ व जळगाव डाक विभागातर्फे ग्राहकांना घरपोच सेवा
भुसावळ : लॉकडाऊन काळात भुसावळ व जळगाव डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ व जळगाव प्रधान डाकघर व विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व डाकघरातील पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बँक ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएसच्या) आधारे त्यांच्या कोणत्याही बँक खात्यातून काढण्याची सुविधा निशुल्क उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे शहरात व खेडेगावातच नव्हे तर आदिवासी पाड्यावरसुद्धा ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. या काळात ६००७४ एईपीएस व्यवहारातून ७१ लाख ३५ हजार ९२७ रुपये रकमेचे वितरण करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्र सर्कलमध्ये ३ आॅगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात जळगाव शाखेने २८ लाख एक हजार २८७ रुपये रकमेचे एक हजार ८५९ एईपीस व्यवहार करून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
ग्राहकांनी भुसावळ व जळगाव डाक विभागाअंतर्गत येत असलेल्या सर्व पोस्ट आॅफिसेसमधून सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक पी.बी.सेलूकर यांनी कळविले आहे.
एईपीस व्यवहारामुळे लॉकडाऊन काळात वित्तीय समवेशनाचे उत्तम काम सुरू आहे. तसेच कोरोनासंदर्भातील सर्व सुरक्षांचे पालन केले जात आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मनीष तायडे यांनी केले आहे.