शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

हिवरीचा युवक बुलडाण्याजवळ धरण परिसरातून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 9:28 PM

शोधकार्य सुरू : पहूर येथून नातेवाईक रवाना

पहूर, ता.जामनेर : तालुक्यातील हिवरी दिगर येथील युवक बहिणीकडे बुलडाणा येथे गेला असता येळगाव धरण परिसरातून शनिवारपासून बेपत्ता झाला आहे. धरणाजवळील विहिरीवर त्याचे कपडे व मोबाईल आढळून आल्याने नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.रहिवासी सागर रघुनाथ पाटील हा युवक बुलढाणा येथील त्याच्या बहिणीकडे गेला होता. शनिवारी दुपारी घराच्या बाहेर पडला असता पावणे चार वाजता धरणावर जात असून उशीर होईल, असा संदेश त्याने बहिणीला पाठविला. त्यानंतर बहीण व पाहुणे यांनी धरणाकडे जाऊन पाहिले असता धरणाजवळ त्याचे कपडे, मोबाईल आढळून आले. मात्र सागर आढळला नाही. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. रविवारी माहिती मिळताच पहूर येथील नातेवाईक रवाना झाले असून सागरचे शोधकार्य सुरू आहे.बहीण शीतल पाटील व पाहुणे प्रदिप पाटील यांनी सायंकाळी पाच वाजता बुलढाणा शहराजवळ असलेल्या एळगाव धरणावर जाऊन परिसरात शोध घेतला असता तिथे सागरचे कपडे, मोबाईल धरणातील एका विहीरीवर आढळून आले आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सागरचे शोधकार्य सुरू आहे. याबाबत बुलढाणा शहरातील पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, आर.बी.पाटील, रमेश पाटील व डॉ. डी.एन.पाटील होळकर यांनी रविवारी बुलढाणा येथे जाऊन घटनास्थळी शोध घेतला. एक दिवस उलटूनही सागरचा तपास लागत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. अहमदनगरहून सोमवारी पाणबुड्यांचे पथक पाचारण करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे. हिवरीतील स्वभावाने गरीब परीवारातील सागर हा एकुलता एक मुलगा असून तीन बहिणी आहेत, अशी माहिती मिळाली.