दुभाजकाला धडक, ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:40 IST2021-03-28T21:40:39+5:302021-03-28T21:40:46+5:30

पिंप्री अकाऊत फाटा: मोटरसायकलस्वारास वाचवितानाची घटना  

Hitting the divider, the truck overturned | दुभाजकाला धडक, ट्रक उलटला

दुभाजकाला धडक, ट्रक उलटला


मुक्ताईनगर  :   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पिंपरी अकाऊत फाट्यावर मोटरसायकल स्वराला वाचवण्यासाठी गुजरात कडून मलकापूरकडे  जातान दुभाजकाला धडक लागून झालेल्या अपघातात ट्रकसह गाडीतील धान्याचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली
  गुजरात कडून नागपूरकडे जात असताना पिंपरी अकाऊत फाट्यावर समोरून येणारा मोटारसायकल स्वार अंगावर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची (क्रमांक जीजे ११ वाय ८०७०) धडक डिव्हायडरला बसली. त्यात ट्रकची दोन्ही पुढचे चाक निखळून पडले. आणि ट्रक पलटी झाली. 
सुदैवाने त्यातील  चालक व वाहक हे बचावले.  मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गाडीतील असलेले धने व ट्रकचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. यावेळी होमगार्ड सिद्धार्थ प्रल्हाद धुंदे व गजानन मराठे यांनी तत्काळ सुरक्षा दिल्याने मालाची लूट देखील थांबवण्यात आली.

Web Title: Hitting the divider, the truck overturned