शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीनमध्ये चोरटे लावतात छुपे कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:35 IST

एटीएममधून पैसे काढत असाल तर सावधान...आपल्या अज्ञानाचा किंवा साधेपणाचा गैरफायदा घेऊन भामट्यांकडून आपली फसवणूक व लुबाडणूक होऊ शकते.

- सुनील पाटील जळगाव : एटीएममधून पैसे काढत असाल तर सावधान...आपल्या अज्ञानाचा किंवा साधेपणाचा गैरफायदा घेऊन भामट्यांकडून आपली फसवणूक व लुबाडणूक होऊ शकते. अलीकडच्या काळात राज्यच नव्हे, तर देशभरात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, डोळ्याने कमी दिसणारे, कमी शिक्षण झालेल्या व्यक्तीच मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागल्या आहेत. कळत न कळत आपल्या खात्यातून लाखो रुपये काढले जात आहेत. काही घटना लगेच उघड होतात तर काही घटना निदर्शनास यायला वेळ लागतो. विशेष म्हणजे अशा घटना घडल्यानंतर संशयित अद्यापपर्यंतही निष्पन्न झालेले नाहीत. कधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या असतील तरीही त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना अतिशय सतर्कता बाळगावी लागणार आहे. चोरी, दरोडा व घरफोडीनंतर हा नवा फंडा अवलंबला जात आहे. बॅँकेकडूनही आपणास मदत मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे एटीएम कार्डधारकालाच जागृत रहावे लागणार आहे.>लुबाडणूक झाल्यानंतर भामटे शहरच सोडून पसार होतातज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन ‘काका मी तुम्हाला मदत करतो’ माझ्याजवळ कार्ड द्या..मी तुमचे पैसे काढून देतो असे सांगून जळगाव जिल्ह्यात अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. ही गुन्ह्याची पध्दत एकट्या जळगावपुरता मर्यादीत नसून राज्य व देशात सुरु आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात यात संशयित चोरटे हे परप्रांतीयच असल्याचे निष्पन्न झालेले आहेत. एका शहरात गंडविण्याचा प्रकार घडल्यानंतर ते वर्ष, दोन वर्ष त्या शहरात किंवा जिल्ह्यात फिरकत सुध्दा नाहीत.जळगाव जिल्ह्यात घडलेल्या घटनांपैकी एकही घटना उघडकीस आलेली नाही. बॅँकांनीही अशा घटनांमध्ये हातवर केले आहेत. विशेष म्हणजे या एटीएम व डेबीट कार्डाच्या माध्यमातून मॉलमधून खरेदीही केली जाते.>काय खबरदारी घ्याल...आपल्या मागे कोण थांबलेले आहे, याची माहिती ठेवा. शक्यतो अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देवू नका. एटीएमची पुरेशी माहिती नसेल तर जवळच्या नातेवाईकाला सोबत आणा व आपले कार्ड आपल्याच हातात ठेवा.गोपनीय कोडही आपणच टाकावा. मशीनमध्ये कुठे गुप्त कॅमेरे नाहीत ना? याची खात्री करा.>एटीएम मशीनमध्ये गुप्त कॅमेरेहीअनेक घटनांमध्ये असेही निष्पन्न झाले आहे की, काही भामटे एटीएम मशीनमध्ये बारीक स्वरूपाचा कॅमेरा बसवितात. त्यातून ग्राहकांचे गुप्त कोड हेरले जातात. त्यानंतर, कार्ड क्लोन किंवा तांत्रिक माहितीचा उपयोग करून त्या कोडच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे काढले जातात. असे गुन्हे करणारे भामटे या तंत्रज्ञात अतिशय तज्ज्ञ असतात. सायबर गुन्ह्यात ही पद्धत मोडली जाते. आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती झालेली आहे. फसवणूक झालेले ग्राहक तेथे तक्रार करू शकतात.>अशी होतेय फसवणूकएटीएममध्ये ज्येष्ठ किंवा कमी शिक्षण घेतलेले नागरिक पैसे काढायला गेले असता, भामटे अशा लोकांवर नजर ठेवून असतात. पैसे काढणाºया व्यक्तीच्या मागे थांबून, ‘आजोबा, काका, भाऊ’ असे म्हणत मी तुम्हाला मदत करू का? अशी विचारणा करतात. तंत्रज्ञान फारसे अवगत नसलेल्या व्यक्ती पटकन मदत घ्यायला तयार होतात.या व्यक्तींजवळील एटीएम कार्ड आपल्या हातात घेऊन मशीनमध्ये कार्ड टाकले जाते. तेथे गोपनीय असलेला पिन कोड संबंधित व्यक्तीला टाकायला सांगितला जातो किंवा आपल्याच हाताने टाकला जातो. विशिष्ट रक्कम काढल्यानंतर ती रक्कम त्या व्यक्तीच्या हातात दिली जाते. नंतर हात चलाखीने ज्येष्ठ नागरिकाजवळील कार्ड स्वत:जवळ ठेवून भामट्याजवळील कार्ड ज्येष्ठ नागरिकाच्या हातात दिले जाते.या भामट्यांकडे अनेक बॅँकाचे कार्ड असतात, एटीएममध्ये प्रवेश करताना खिशातच ते कार्ड ठेवलेले असतात. मदत करणाºया व्यक्तीजवळ ज्या बॅँकेचे कार्ड असते, त्याच बॅँकेचे कार्ड लुबाडणूक केलेल्या नागरिकाच्या हातात दिले जाते. ही व्यक्ती काही अंतर गेल्यानंतर काही क्षणातच दुसºया किंवा त्याच एटीएममधून त्या कार्डाच्या माध्यमातून रक्कम काढली जाते.>एटीएममधून पैसे काढताना आपले कार्ड कोणाच्याच हातात देवू नये. चुकून कार्ड दिले गेले व काही संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन तसेच बॅँकेत त्याची माहिती द्यावी. जेणे करुन कार्ड ब्लॉक करता येते व आपली फसवणूक टळू शकते.-बापू रोहोम, वरिष्ठ पोलीसनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा