भुसावळ येथे रेल्वेतर्फे हेरिटेज वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:19 IST2018-12-24T23:16:31+5:302018-12-24T23:19:24+5:30

रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी ‘हेरिटेज वाक’चे आयोजन करण्यात आले होते.

Heritage Walk by railways at Bhusawal | भुसावळ येथे रेल्वेतर्फे हेरिटेज वॉक

भुसावळ येथे रेल्वेतर्फे हेरिटेज वॉक

ठळक मुद्देरेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी व विविध यंत्रणांचा सहभागडीआरएम आॅफिस ते हेरिटेज संग्रहालयापर्यंत राबविला उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी ‘हेरिटेज वाक’चे आयोजन करण्यात आले होते.
डीआरएम आॅफिस ते हेरिटेज संग्रहालयापर्यंत सोमवारी सकाळी सातला हा उपक्रम घेण्यात आला. अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा यांच्या हस्ते वाकिंगला झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. ही रॅली डीआरएम आॅफिस येथून सुरू होऊन रेल्वे म्युझिअमपर्यंत काढण्यात आली.
रेल्वेचे जुने वाफेचे इंजिन, कोळशाचे इंजिन अशा काही जुन्या बाबी आहेत त्यांची जनतेला माहिती व्हावी यासाठी या उपक्रमाचे रेल्वेतर्फे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये वरिष्ठ मंडळ परिचालन अधिकारी स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ यांत्रिक प्रबंधक पी. रामचंद्रन, मंडळ यांत्रिक प्रबंधक लक्ष्मी नारायण, वरिष्ठ विद्युत अभियंता जी.के.लखेरा, मुख्य सुरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, स्टेशन निर्देशक जी. अय्यर, मंडळ कार्मिक अधिकारी एम.के.गायकवाड यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच पर्यावरण व गृह प्रबंधन विभागाचे सिनिअर सेक्शन इंजिनिर अनंत झोपे, सेन, संतोष श्रीवास, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रीतम राणे, भारत चौधरी, सर्व कर्मचारी आणि स्काऊट आणि गाईडचे सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

Web Title: Heritage Walk by railways at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.