गोरगरीब विद्यार्थ्यांना करणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:10 IST2018-08-25T16:10:14+5:302018-08-25T16:10:32+5:30
फत्तेपूर परिसरातील जि.प. शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

गोरगरीब विद्यार्थ्यांना करणार मदत
फत्तेपूर, ता.जामनेर, जि.जळगाव : या परिसरातील विविध गावांना कार्यरत असलेल्या शिक्षकांनी कांग परिसर शिक्षक मंडळाची स्थापना केली आहे. याद्वारे परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी फूल ना फुलाची पाकळी अशी मदत व्हावी या उद्देशाने गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य मदतपेटीची संकल्पना मनात घेतली व येथील बसस्थानकाजवळ सदर पेटी ठेवली आणि स्वत: सर्वांनी त्यात योगदान देऊन दात्यांना याबाबत मदतीचे आवाहन केले.
या संकल्पनेत जि.प.शिक्षक प्रवीण पाटील, रवींद्र चिंचपुरे, वीरेंद्र बागुल, अजिमशा इसाशा, कौतिक औटे, साहेबराव वाघ, सरफराज पठाण, किशोर महाजन, प्रशांत महाले, सचिन जोशी, रवींद्र तायडे, सखाराम शिंदे, सूर्यवंशी, गजानन पारधी यांनी सहभाग घेतला.
पं.स सदस्य एकनाथ लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र भंसाली, माजी पं.स सदस्य संजय चौधरी, संतोष नेरिया अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मदत पेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला.