जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST2021-06-01T04:13:54+5:302021-06-01T04:13:54+5:30

अमळनेर तालुक्यातील डांगर येथे सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने डांगर येथे बांधलेला बंधारा ओसंडून वाहू ...

Heavy rains in the district for the second day in a row | जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

अमळनेर तालुक्यातील डांगर येथे सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने डांगर येथे बांधलेला बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. निपाणे, ता. एरंडोल परिसरात सोमवारी संध्याकाळी ४० मिनिटे वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. यामुळे धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण पसरले आहे. कासोदा, ता. एरंडोल परिसरातही १५-२० मिनिटे दमदार पाऊस झाला.

उंबरखेड, ता. चाळीसगाव येथे सोमवारी सायंकाळी अर्धा तास पाऊस झाला. पावसामुळे कपाशी लागवडीला वेग येणार आहे. पिंपळगाव हरेश्वर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या. यामुळे शेतकामांना वेग आलेला आहे. दहीगाव संत, ता. पाचोरा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे गावातील विजेचे खांब, मोठी झाडे उन्मळून पडली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Heavy rains in the district for the second day in a row