आगामी दोन दिवसात उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:01+5:302021-03-27T04:17:01+5:30

वर्डी येथील सुकनाथ बाबांचा भंडारा रद्द जळगाव - जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता, चोपडा तालुक्यातील वर्डी येथे धुलीवंदन ...

Heat waves in the next two days | आगामी दोन दिवसात उष्णतेची लाट

आगामी दोन दिवसात उष्णतेची लाट

वर्डी येथील सुकनाथ बाबांचा भंडारा रद्द

जळगाव - जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता, चोपडा तालुक्यातील वर्डी येथे धुलीवंदन निमित्त दरवर्षी आयोजित होणारा सुकनाथ बाबांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मात्र कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुकनाथ बाबा मंदिर हा भंडारा चा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या नगरसेवकांचा अपात्रतेच्या प्रस्ताव तयार

जळगाव - महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपमधून फुटलेल्या सत्तावीस नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी चा प्रस्ताव भाजप कडून तयार करण्यात आला आहे. मंगळवारी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच महापौर व उपमहापौर पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन महासभेत नगरसेवकांचा व्यतिरिक्त इतरांचा सहभाग असल्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीदेखील भाजपने सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा

जळगाव - शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल आणि कोविड लसीकरण सेंटरची महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी शहरात लसीकरण वाढवण्यासाठी मनपा मालकीची काही स्थळे महापौरांनी सुचवली आणि त्याठिकाणी तातडीने व्यवस्था करण्याचे सांगितले. निमखेडी परिसर हा खूप दूर असल्याने दादावाडी परिसरात हेल्थ पोस्ट यासाठी ३-५ खोल्या बंधाव्या आणि रुग्ण लसीकरणासाठी ते आल्यावर त्यांचे तापमान घेणं, त्यांना निर्जंतुककरण करणे याबाबत योग्य खबरदारी घ्यावी अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

अखंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

जळगाव - तालुक्यातील आव्हाने, वडनगरी, खेडी व फुपनगरी या गावांमध्ये गेल्या चार दिवसांपासून दररोज रात्री आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या भागात कोणतेही वादळ किंवा पाऊस नसताना देखील सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे महावितरणकडून यंदा भारनियमन असल्याचे सांगितले जात असताना तब्बल आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: Heat waves in the next two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.