शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चाळीसगावात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 22:50 IST

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५० ते २०० जणांच्या घरी दररोज सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दररोज १५० ते २०० जणांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

सद्य:स्थितीत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद, खेडगाव, लोंढे, पातोंडा, रांजणगाव, शिरसगाव, तळेगाव, तरवाडे, उंबरखेड, वाघळी या दहा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य सेवक, सेविका, कर्मचारी यांच्यावतीने दैनंदिन घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. 

त्यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप आदी आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांची वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून त्यांचे स्वॅब घेतले जातात. त्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जात आहे. गृहभेटीत या कर्मचाऱ्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीही केली जात आहे. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांच्याकडून याबाबत मदत घेतली जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नयेत. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे आदी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

आरोग्य विभागात ६५ पदे रिक्त

चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण ६५ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणा पांगळी झाली झाली आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. त्यामुळे इतरांवर कामाचा ताण वाढला आहे.

रिक्त पदे अशी

आरोग्य सहायक २, आरोग्य सहायिका ९, आरोग्य सेवक ९, आरोग्य सेविका २३, औषध निर्माण अधिकारी ३,परिचर १९ अशी एकूण ६५ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.

चाळीसगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळावे.-डॉ. देवराम लांडे,तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावcorona virusकोरोना वायरस बातम्या