महिला क्रीडा मंडळातर्फे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST2021-08-18T04:23:09+5:302021-08-18T04:23:09+5:30
या वेळी तज्ज्ञ डॉक्टर्स डॉ. वर्षा कोळंबे (नेत्रतज्ज्ञ), डॉ. दीप्ती चौधरी (स्त्री रोगतज्ज्ञ), डॉ. संज्योत पाटील (फिजीशियन), डॉ. ऊर्मी ...

महिला क्रीडा मंडळातर्फे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
या वेळी तज्ज्ञ डॉक्टर्स डॉ. वर्षा कोळंबे (नेत्रतज्ज्ञ), डॉ. दीप्ती चौधरी (स्त्री रोगतज्ज्ञ), डॉ. संज्योत पाटील (फिजीशियन), डॉ. ऊर्मी ठक्कर (पॅथॉलॉजी), डॉ. जागृती राणे (जनरल) यांनी तपासणी केली.
महिला क्रीडा मंडळ भुसावळच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी प्रास्ताविक केले. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी क्रीडा मंडळाच्या मेंबर्सचे आभार मानले आणि आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. डॉ. ऊर्मी ठक्कर यांनी ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्वतः स्वतःची तपासणी कशी करायची, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यात एकूण ३२ महिला पोलिसांची तपासणी झाली. यापैकी ४ कर्मचाऱ्यांना शुगर व काहींना ब्लड प्रेशरचे निदान झाले. तज्ज्ञांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
संपूर्ण औषधी सक्षम-सेवा फाउंडेशन जळगावतर्फे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रगती ओक व आभार प्रदर्शन जयश्री ओक यांनी केले.
या वेळी महिला क्रीडा मंडळच्या सचिव लता होसकोटे, अनिता कवडीवाले, सुनीता पाचपांडे, मंगला पाटील, प्रभा पाटील, अनिता महाजन, वीणा ठाकूर, वैशाली बऱ्हाटे, प्राची राणे, लता ढाके, प्रमिला नेमाडे, संगीता मुजूमदार, स्वाती नाईक, माधुरी गुजर, माधुरी गव्हाळे, वैशाली भगत, दीपा सोनार यांनी परिश्रम घेतले.