'प्रयास' राबविणार आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:06+5:302021-09-10T04:22:06+5:30
जळगाव : पिंप्राळ्यातील प्रयास मित्र मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात आरोग्य व सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. नुकतीच मंडळाची कार्यकारिणीही ...

'प्रयास' राबविणार आरोग्य शिबिर
जळगाव : पिंप्राळ्यातील प्रयास मित्र मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात आरोग्य व सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. नुकतीच मंडळाची कार्यकारिणीही जाहीर झाली असून मंडळाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस पाटील विष्णू पाटील यांनी तर उपाध्यक्ष म्हणून कासमबाब पटवे यांची निवड करण्यात आले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्यावतीने आरोग्यवर्धक औषधी वाटप, अँटिजेन टेस्ट शिबिर, प्लाझ्मा दान शिबिर तसेच वृक्षारोपण व अन्नदान, कोरोना योध्दांचा सत्कार, युवकांना रोजगार मिळविण्यासाठी उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, मंडळात हिंदू-मुस्लीम पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन मंडळाकडून घडवून आणले जाते. नुकतीच गणेशोत्सवासंदर्भात मंडळाची बैठक पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी काय काळजी घ्यावी यावर सूचना करण्यात आल्या. बैठकीमध्ये मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास चौधरी, नाशिर शेख, आदिल शेख, सादीक खाटीक, हितेश कोष्टी, विजय जोगी, दीपक कोष्टी, संतोष शेळके, सागर जोगी, पवन शिखरे, अर्जुन डाभे, जितेंद्र बिरारी आदींची उपस्थिती होती.