लोकशाही दिनाच्या तक्रारी प्रलंबित राहिल्यास कार्यालय प्रमुख जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:14+5:302021-09-07T04:21:14+5:30
नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावे, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, याकरिता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात ...

लोकशाही दिनाच्या तक्रारी प्रलंबित राहिल्यास कार्यालय प्रमुख जबाबदार
नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावे, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, याकरिता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्यासह तालुक्याचे तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
दांडी बहाद्दरांवर कारवाई
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांना न्याय देण्याची भूमिका प्रत्येक विभागाने ठेवली पाहिजे. जे अधिकारी लोकशाही दिनास अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे तातडीने निवारण करणे आवश्यक आहे, अन्यथा संबंधितांस जबाबदार धरण्यात येईल. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, तसेच आस्थापनाविषयक बाबी लोकशाही दिनात दाखल करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माहिती अधिकार अर्जांचा घेतला आढावा
जिल्हाधिकारी राऊत यांनी माहिती अधिकारातंर्गत प्राप्त झालेल्या अर्जाचा आढावा घेतला. माहिती अधिकारातंर्गत प्राप्त अर्जांवर शासकीय नियमानुसार विहित कालावधीत कार्यवाही होणे आवश्यक असून, नियमानुसार उपलब्ध माहिती तातडीने अर्जदारास उपलब्ध करून द्यावी. जी माहिती नियमाने देता येत नाही अथवा संबंधित नसेल त्याचे उत्तर तातडीने संबंधितांस द्यावे, माहिती अधिकाराचा अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता सर्व जन माहिती अधिकारी यांनी घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.