शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जन्मा आलो त्याचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:08 IST

एखाद्याला अमृताच्या कुंडात टाकल्यानंतर त्याने तोंड गच्च दाबून धरले तर काय उपयोग.

जन्म आणि मरण या दोन आवश्यक प्रक्रिया आहेत. पुनरपि जननं पुनरपि मरणं या न्यायाने ते बंधन आहे. परंतु जन्माला आल्यानंतर संत कृपेशिवाय जन्माचे सार्थक होत नाही संतकृपा ही आवश्यक आहे व सफल आहे. एखाद्याला अमृताच्या कुंडात टाकल्यानंतर त्याने तोंड गच्च दाबून धरले तर काय उपयोग.अमृताच्या सागरी बुडीजे !आणि तोंडा का वज्रमिठी पाडिजे! त्यास अमृत काय करणार तसा संतांचा अनुभव. संतांनी जगासाठी अमृताचा कुंभ मोकळा करून ठेवला आहे. उदाहरणार्थ तेजाचे भांडार देवाने सूयार्ला दिले. परी महेशे सूर्या हाती ! दिधली तेजाची सुती !तया भासा अंतर्वर्ती ! जगची केले ! अर्थात सूयार्ने ते जगाला दिले तसा संतांचा अनुभव संत गुप्त ठेवीत नाही सेवितो हा रस वाटीतो आणिका !तो ते अनुभव जगाला देतात आणि जगाला त्याची गरज आहे जगाला तो अनुभव घेता येतो घेणाऱ्याला त्याची गरज वाटली पाहिजे व घेता आला पाहिजे देणाºयाने ही दिले पाहिजे जे जे संसारात गरज आहे आहे ते मिळत नाही व मिळते त्याची गरज नाही पण संतांचे अनुभवाची सर्वांना गरज आहे कारण तो सफल आहे देवाचे वर्णन केले तर देवाला बरे वाटेल का संतांचे वर्णन केले तर देवापुढे आल्यावर देवाची आवड काय आहे, हे पहावे लागते देवाला काय आवडते हे देवच बोलतो देवाला संत प्रियआहेत परंतु देव व संत वेगळे नाहीत देव ते संत !संत ते देव !निमित्त त्या प्रतिमा ! सारांश संता पासून व्यक्तीला जो अनुभव येतो तो हाच की जन्माला आलो त्याचे आजि फळं झाले साचें! तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती! मी जन्माला आलो त्याचे आज फळ झाले व ते आज साच झाले यात फळ व साच हे दोन शब्द महत्त्वाचे आहे पुढील संसाराचा जो अनर्थ आहे त्याचा पाया म्हणजे जन्म आहे हे सगळे दु:ख जन्माला आलो म्हणून संसार म्हणजे जन्ममृत्यू संसार सागरात!मृत्यू हा जन्माचा उपलक्षण आहे, ही एक बाजू झाली व दुसºया बाजूला जन्माबद्दल आनंद मानला जातो. बरे झाले आलो या जन्मासी! जोड जोडली मनुष्यदेह ऐसी! धन्य आम्ही जन्मा आलो !दास विठोबाचे झालो ! अनिष्ट निवृत्ती व इष्ट प्राप्तीचे साधन जन्म आहे हे जन्माला आलो नसतो तर पंढरीची वारी पांडुरंगाचे दर्शन संत संगती हा सोहळा पहायाला मिळाला नसता. एकच वस्तू जन्म ती अनुकूल प्रतिकूल भावनेचा विषय होऊ शकत नाही उदाहरणार्थ एका माणसाने माझ्या हातावर काळा खडा दिला मी त्यावर मुर्खा म्हणून रागावलो व तो खडा फेकून दिला. नंतर तो म्हणाला महाराज या मातीच्या खड्याच्या भाव पाचशे रुपये तोळा आहे ही कस्तुरी आहे दिसायला काळी माती ती पण गुण केवढा. कस्तुरीचे रूप अति हिन वर! रूप हिन कस्तुरी पण सुगंध किती? कस्तुरी ही शरीरातील उष्णता नष्ट झाली तर ती निर्माण करते हे ऐकल्याबरोबर मी तो खडा शोधु लागलो फेकून देणाराही मीच व परत शोधून काढणारही मीच वस्तू एकच होती याचे कारण कस्तुरी ही स्वरूपाने प्रतिकूल पण गुणाने अनुकूल तसा देहा स्वरूपाने प्रतिकूल. म्हणून जन्मा आलो त्याचे अजि फळ झाले साचें! सूयार्चा उदय आज झाला पण आजच झाला असे नाही त्याप्रमाणे जन्माचा व जिवाचा संबंध सूर्योदय व सूर्यास्तासारखा आहे. जन्माला अनेक वेळा आलो तसा आजही आलो पण संत कृपेमुळे फळ आज झाले बहुत दिवस होती मज आस! आजी घडले सायास रे ! मागे अनेक वेळा जन्माला आलो पण फळ झाले नाही ते फळ संत कृपेमुळे आज मिळाले. एक कोय असते त्याला खांबे येतात तसे संसारात मिळेपर्यंत बायको साध्य राहते पुढे ती साधन होते सत्य फळ काय हे कळत नाही तुम्ही संसाराला फळ समजत असाल.., साध्य समजत असाल पण ते खरे नाही संसार हा रमणीय आहे साधन म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे ते हे फळ ही नाही व साचं फलही नाही तर सात फळ म्हणजे तुम्ही सांभाळले संती भय निरसळे खंती! असेच होय.- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव