शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर दीड महिना घरीच होता, दसऱ्याला रेल्वेखाली केली आत्महत्या; पिंप्राळ्यातील तरुणाने आयुष्य संपवले, कारण अस्पष्ट

By विजय.सैतवाल | Updated: October 25, 2023 15:46 IST

याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : घरासह परिसरात विजयादशीचा सण साजरा केला जात असताना अभिषेक सुभाष राठोड (२२, रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री आशाबाबा नगरजवळ घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंप्राळा भागात आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहणारा अभिषेक राठोड हा तरुण मुंबईतील एका विधी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो जळगावातच राहत होता. मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री अभिषेकने आशाबाबा नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तरुणाजवळील मोबाईलच्या आधारे ओळख त्याची ओळख पटली.

घरात आनंदाचे वातावरण अन् मुलाच्या मृत्यूची वार्ता धडकलीमंगळवारी दसरा सण साजरा केला जात असताना राठोड यांच्या घरीही आनंदाचे वातावरण होते. त्याच वेळी मुलाच्या मृत्यूची वार्ता समजली अन् या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. या प्रकरणी अभिषेक हा पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील (कंट्रोल रुम) सुभाष राठोड यांचा मुलगा होता. मयताच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहेत. 

टॅग्स :Jalgaonजळगावrailwayरेल्वेPoliceपोलिस