घटस्फोट देत नसल्याने पत्नीवर विळ्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:14 IST2021-02-15T04:14:36+5:302021-02-15T04:14:36+5:30

जळगाव : नांदायलाही येत नाही आणि घटस्फोटही देत नाही या कारणामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर विळ्याने वार करून ठार ...

He stabbed his wife for not divorcing him | घटस्फोट देत नसल्याने पत्नीवर विळ्याने वार

घटस्फोट देत नसल्याने पत्नीवर विळ्याने वार

जळगाव : नांदायलाही येत नाही आणि घटस्फोटही देत नाही या कारणामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर विळ्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवाजी नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सचिन किसन भगत (३०, रा.मंगरूळ, ता.पारोळा) याच्याविरुद्ध रविवारी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे.

शिवाजी नगरातील हुडकोत राहणारा मंगेश उर्फ नीलेश शांताराम बिऱ्हाडे या तरुणाची बहीण सुषमा हिचा मंगरूळ येथील सचिन भगत याच्याशी विवाह झालेला आहे. सचिन व सुषमा यांच्यात अनेक दिवसांपासून वाद असल्याने सुषमा माहेरी आलेली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन सचिन हा सुषमाकडे घटस्फोट मागत आहे. त्यातून दोघांमध्ये मतभेद आहेत. शनिवारी सचिन हा पत्नीच्या माहेरी आला. यावेळी शालक मंगेश हा पलंगावर झोपलेला असताना घटस्फोट पण देत नाही व नांदायला पण येत नाही असे म्हणत सचिन याने घरातील विळा आणून सुषमा हिच्या मानेवर सपासप वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या सुषमा हिला रुग्णालयात दाखल केले असून ती बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. भाऊ मंगेश याने शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्याविरुद्ध सचिन भगत याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: He stabbed his wife for not divorcing him