रावेर तालुक्यातील सावदा येथे पावसासाठी हजरत पीरमंजन बाबांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 15:04 IST2019-06-12T15:03:32+5:302019-06-12T15:04:49+5:30
हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीरमंजन शाहवली दरगावहर संदलनिमित्त फुलांची चादर चढविण्यात आली.

रावेर तालुक्यातील सावदा येथे पावसासाठी हजरत पीरमंजन बाबांना साकडे
ठळक मुद्देहजरत पीरमंजन शाहवली दरगाहवर चादर चढवलीसर्वत्र शांतता नांदावी यासाठी केली प्रार्थना
सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीरमंजन शाहवली दरगावहर संदलनिमित्त फुलांची चादर चढविण्यात आली. बुधवारी हा कार्यक्रम झाला.
या वर्षी चांगला पाऊस पडावा व सावदा शहरासह सर्वत्र शांततापूर्ण वातावरण राहावे अशी प्रार्थना सर्वांनी हजरत पीरमंजन शाहवली बाबांच्या दरगाहवर चादर चढवताना केली.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सय्यद अजगर, पंकज येवले नगरसेवक अलाबक्ष, श्याम पाटील, गजू लोखंडे, अस्लम शेख, ईलियास खान, मुराद तडवी, अब्दुला शेख, अजमलखान, कमाल जनाब डॉ. रईसखान आदी मान्यवर उपस्थित होते.