रिक्षा दुरुस्तीसाठी माहेरुन पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:51+5:302021-07-03T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रिक्षा दुरुस्तीसाठी माहेरुन एक लाख रुपये आणावे, यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ...

रिक्षा दुरुस्तीसाठी माहेरुन पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रिक्षा दुरुस्तीसाठी माहेरुन एक लाख रुपये आणावे, यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनीतील उस्मानिया मस्जीदजवळील माहेरवाशीण सायमाबी अब्दुल अकील (२१) या विवाहितेचा रावेर येथील अब्दुल अकील अब्दुल शकील याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहितेने माहेरुन रिक्षा दुरुस्तीसाठी एक लाख रुपये आणावे, यासाठी पती अब्दुल अकील, सासरे अब्दुल शकील अब्दुल रसुल, नणंद नाझिया अब्दुल शकील यांच्याकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. अखेर सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गुरूवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली असून, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय धनगर हे करीत आहेत.