वानराच्या दशक्रिया विधीला हनुमान भक्तांनी केले मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 06:28 PM2020-12-05T18:28:57+5:302020-12-05T18:31:35+5:30

वानराच्या दशक्रिया विधीवेळी शनिवारी शेकडो हनुमान व रामभक्तांनी मुंडन केले.

Hanuman devotees shave the monkey's Dasakriya ritual | वानराच्या दशक्रिया विधीला हनुमान भक्तांनी केले मुंडन

वानराच्या दशक्रिया विधीला हनुमान भक्तांनी केले मुंडन

Next
ठळक मुद्देपातोंडा येथे एका वानराचा झाला होता दुर्दैवी मृत्यूग्रामस्थांनी अंत्यविधी करून सुतक पाळले होते

लोकमत न्यूज नेटवर्क

पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडा येथे वानरच्या दशक्रिया विधीवेळी शनिवारी शेकडो हनुमान व रामभक्तांनी मुंडन केले.

येथे श्री दत्त मंदिर परिसरात एका वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गावावर काहीएक संकट येऊ नये, म्हणून गावाने वानराचा विधिवत अंत्यविधी करून दहा दिवस सुतक पाळले होते. माणसाप्रमाणे शनिवारी विधिवत त्या वानराचा दशक्रिया, गंधमुक्ती, पितरांचा व गाव पंगतीचा व रात्री हभप भरत महाराज म्हैसवाडीकर(यावल)कीर्तनाचा कार्यक्रम श्री दत्त मंदिर प्रांगणात पार पडला. यावेळी शेकडो ग्रामस्थानीं मुंडन केले. याकामी श्री दक्षिणमुखी हनुमान मंडळासह संपूर्ण ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. 

Web Title: Hanuman devotees shave the monkey's Dasakriya ritual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.