रोजगार गमावलेल्या मजुरांसाठी मदतीचे हात सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 14:24 IST2020-04-01T14:23:22+5:302020-04-01T14:24:47+5:30
३५० मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

रोजगार गमावलेल्या मजुरांसाठी मदतीचे हात सरसावले
अमळनेर, जि.जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आल्याने रोजंदारीने काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणून मुंदडा डेव्हलपर्सकडून३५० मजुरांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येऊन त्यांना मायेचा आधार दिला आहे.
मुंदडा परिवाराने अशा मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मजुरांना प्रत्येकी पाच किलो आटा,दोन किलो तूर डाळ, तीन किलो तांदूळ, एक किलो तेल व एक साबण असे साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रकाश मुंदडा, योगेश मुंदडा, राजू मुंदडा, पंकज मुंदडा, अमेय मुंदडा, अभिनय मुंदडा, शुभम मुंदडा, संजय वर्मा, मित्र परिवार, ठेकेदार व मजूर उपस्थित होते.