शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

लॉक डाऊन मध्ये सरसावल मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:25 IST

संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून घरपोच मिळणार औषधी, किराणा : आॅनलाईन बुकींग केल्यानंतर घरपोच मिळणार सेवा

जळगाव : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांचे हाल होण्याची भिती ओळखून शहरातील काही सामाजिक संस्था आपआपल्या परीनेमदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

भारत विकास परिषद अंतर्गत संपर्क फाऊंडेशनच्यावतीने गरजू वयोवृद्ध पेशंटसाठी होम नर्सिंग सुविधा तसेच पेशंटसाठी अटेंडंटची सुविधा देण्यात येत असून, संचारबंदी आहे तो पर्यंत ज्या लोकांना अत्यावश्यक असलेले औषधी व किराणा ही घरपोच आणून देण्याची व्यवस्था संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यासाठी संपर्क फाऊंडेशनने हेल्पलाईन क्रमांक (८४३२२७८६२४ ) जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नागरिक आवश्यक असलेली औषधी, किराणा हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान नोंद करु शकणार आहे. हे सर्व नोंद केलेले साहित्य दुसऱ्या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांना घरपोच मिळणार आहे. कोणताही डीलीव्हरीची रक्कम ग्राहकांना देण्याची गरज नाही. भारत विकास परिषदेच्या संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमात पुरुषोत्तम न्याती, प्रसन्न मांडे, तुषार तोतला, उज्ज्वल चौधरी, उमेश पाटील, चेतन दहाड, राजीव नारखेडे, रवींंद्र लढ्ढा, चेतना नन्नवरे, डॉ. योगेश पाटील, धनंजय खडके, विशाल चोरडीया व प्रशांत महाजन यांचा समावेश आहे. नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर नोंदणी करुन जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा. जेणेकरुन गर्दीत जाणे सहज टाळणे शक्य होईल. असे संपर्क फाऊंडेशनच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.गोर-गरिबांना नि:शुल्क जेवणदररोज ४०० गोर-गरिब व मजूर व्यक्तींना जेवणाचे नि:शुल्क पाकीट हे संचारबंदी काळात संपर्क फाऊंडेशनच्यावतीने वितरीत केले जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव