संविधान आर्मीतर्फे विविध मागण्यांसाठी अर्धनग्न मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:12+5:302021-09-07T04:22:12+5:30
भुसावळ : संविधान आर्मीसह ६ रोजी १० संघटनांतर्फे येथे विविध मागण्यांसाठी आक्रोश अर्धनग्न मोर्चा ...

संविधान आर्मीतर्फे विविध मागण्यांसाठी अर्धनग्न मोर्चा
भुसावळ : संविधान आर्मीसह ६ रोजी १० संघटनांतर्फे येथे विविध मागण्यांसाठी आक्रोश अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. गांधी पुतळ्याजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात अनेक अस्थाई कामगार सहभागी झाले होते.
दीपनगर प्रकल्पातील इंडवेल प्रा.लि. या कंपनीतील ६०० कामगारांचे एक ते चार महिन्यांचे थकीत वेतन तातडीने मिळालेच पाहिजे, तसेच प्रकल्पात तालुक्यातील व परिसरातील स्थानिक बेरोजगारांना काम मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह भुसावळ शहरात घाणीचे साम्राज्य वाढले असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. डेंग्यूचा कहर झाला आहे, तसेच शहरातील रस्ते, पाणी, वीजबिलमधील दरवाढ आदी प्रश्न सोडविण्याच्या मागणीसह अतिक्रमित झोपडी व टपरीधारक यांना जागा मिळावी, महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापकाचा होणार छळ थांबवावा, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करावे, इंधन दरवाढ मागे घ्यावी, म्हणून पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढ रद्द करा, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय मजदूर सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे व नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
आंदोलनात पीआरपी उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, पीआरपी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाप्रमुख आरीफ शेख, छत्रपती सेना जिल्हाप्रमुख गोपी साळी, राष्ट्रीय मजदूर सेना तालुकाप्रमुख सुनील ठाकूर, जिल्हाध्यक्ष हरीश सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन चहाटे, जिल्हामहासचिव चंदू पहिलवान, जयराज भार्गव, टीपू सुलतान सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, संविधान आर्मी युवा जिल्हाप्रमुख राहुल साळुंखे, विशाल पवार, श्रीराम राठोड, छोटू सोनवणे, हिरलाल सोनवणे, मनोहर पवार, गोलू पवार, गीता पाटील, विनयकुमार, अरुणकुमार, आनंदा पवार, दिनेश शहा, बंटीकुमार, निर्मल राठोड, आदी सहभागी झाले होते.