साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्था अध्यक्षपदी हाजी सत्तारखान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:29 IST2020-12-08T13:27:18+5:302020-12-08T13:29:00+5:30

साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत हाजी सत्तारखान हाजी अय्युबखान यांची निवड करण्यात आली.

Haji Sattar Khan as the President of Sir Syed Education Institute at Sakli | साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्था अध्यक्षपदी हाजी सत्तारखान

साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्था अध्यक्षपदी हाजी सत्तारखान

यावल : तालुक्यातील साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत हाजी सत्तारखान हाजी अय्युबखान यांची बहुमताने निवड करण्यात आली. ५ रोजी संस्थेच्या कार्यालयात ही सभा पार पडली. पूर्वीचे अध्यक्ष हाजी आसिफखान हाजी नुरखान यांचे निधन झाल्याने रिक्त पदावर ही निवड करण्यात आली
    संस्थेच्या सर्वसाधारण सभेत २३ पैकी २२ सभासद उपस्थित होते. या सभासदांपैकी अध्यक्ष पदासाठी दोन सभासद इच्छुक होते. त्या दोनमध्ये सय्यद अहमद हाजी सय्यद मीरा, तर दुसरे हाजी सत्तार हाजी अय्युबखान यांचा समावेश होता. उपस्थित सभासदांपैकी १८ सभासदांनी हाजी सत्तारखान हाजी अय्युबखान यांच्या बाजूने कौल दिल्याने संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची बहुमताने निवड करण्यात आल्याचे सभेत जाहीर करण्यात आले. अध्यक्ष पदी हाजी सत्तारखान हाजी अय्युबखान यांची निवड होताच उपस्थित सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.
संस्थेच्या हितासाठी कटिबद्ध -- नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी सत्तारखान
 अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी सत्तारखान यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानत संस्थेच्या हितासाठी मी सदैव कटिबद्ध राहून संस्थेच्या प्रगतीसाठी कटीबद्ध राहील अशी ग्वाही दिली. 

Web Title: Haji Sattar Khan as the President of Sir Syed Education Institute at Sakli