वरखेडी ग्रामपंचायत कार्यालयाजवळच हागणदारी मुक्ती व स्वच्छतेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:17 IST2020-01-15T18:16:26+5:302020-01-15T18:17:15+5:30
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण : वरखेडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने फलकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून ग्रामपंचायतच्या संदेशाला हरताळ फासला आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायतीने हा कचरा उचलण्याची तसदीदेखील घेतलेली नाही.

वरखेडी ग्रामपंचायत कार्यालयाजवळच हागणदारी मुक्ती व स्वच्छतेचा बोजवारा
हेमशंकर तिवारी
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : वरखेडी ग्रामपंचायत कार्यालयाला लागूनच हगणदारी व गावातील रहिवाशांद्वारे केरकचरा आणून टाकला जातो. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर जिल्हा परिषदेतर्फे लावण्यात आलेला ‘खतासाठी खड्डा करू, कचºयाची योग्य व्यवस्था करू. तसेच स्वच्छ व हागणदारी मुक्त गावात आपले सहर्ष स्वागत’ या फलकांची प्रतारणा होताना दिसून येते.
गावातदेखील बºयाच ठिकाणी स्वच्छ गाव संकल्पनेला अशाच प्रकारे छेद जातो. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे ग्रामपंचायतीला मरगळ आल्याची परिस्थिती आहे. यामुळे ग्रामस्थांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असून गावातील बरेच खांबांवरील पथदीवे बंद आहेत. यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. वारंवार याबाबत सांगूनदेखील नवीन पथदिवे लावण्यात आलेले नाही, अशी ग्रामस्थांची ओरड आहे.