ममुराबाद येथे गटारींच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST2021-03-07T04:15:09+5:302021-03-07T04:15:09+5:30

‘प्रभाव लोकमत’चा लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: गावातील तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे पसरलेल्या अनारोग्याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’मध्ये शनिवारी प्रसिद्ध ...

Of gutters at Mamurabad | ममुराबाद येथे गटारींच्या

ममुराबाद येथे गटारींच्या

‘प्रभाव लोकमत’चा

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: गावातील तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे पसरलेल्या अनारोग्याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’मध्ये शनिवारी प्रसिद्ध झाले होते. ग्रामपंचायतीने त्यानंतर लगेच रोजंदारी मजुरांकडून गटारींच्या सफाईला सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

नियमितपणे सफाई होत नसल्याने गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान व मोठ्या गटारी काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्या संदर्भात सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, ग्रामपंचायतीने गटारींमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, गावातील सर्व गटारींची संपूर्ण सफाई खासगी ठेका देऊन केली जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक आर.आर. मनोरे यांनी दिली.

Web Title: Of gutters at Mamurabad