शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शासनाच्या जाचक अटींविरोधात ‘गुरुजीं’चा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 7:38 PM

शाळास्तरावर शिक्षकांना देण्यात आलेली आॅनलाईन कामे, बदली प्रक्रियेतील जाचक नियमासह विविध शासननिर्णयाविरोधात शनिवारी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार जिल्हापरिषदेच्याप्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाची झोप उडवून दिली.

ठळक मुद्देशिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा २४ शिक्षक संघटनांचा सहभागमोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिका

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.४-शाळास्तरावर शिक्षकांना देण्यात आलेली आॅनलाईन कामे, बदली प्रक्रियेतील जाचक नियमासह विविध शासननिर्णयाविरोधात शनिवारी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार जिल्हापरिषदेच्याप्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाची झोप उडवून दिली.  शिस्तबध्दरित्यावकोणत्याही घोषणा न देता काढलेल्या या विराट मोर्चाव्दारे शिक्षकांवर शासनाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटींविरोधात जिल्'ातील २४ शिक्षक संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या.4 शिक्षिकांच्या पंचमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

शिक्षक बदली विषयक २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शिक्षक बदली विषयक  शासन निर्णयात अन्यायकारक बाबी बदलण्यात याव्यात, शिक्षकांवर थोपण्यात आलेल्या आॅनलाईन कामांसाठी शाळास्तरावर डेटा आॅपरेटरची नियुक्ती करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी ४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून घेण्यात आला होता. त्यांच्या निर्णयाला राज्यभरातील शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिल्यानंतर शनिवारी जळगावात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्'ातील सुमारे ५ हजार शिक्षक सहभागी झाले.

मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिकामोर्चाला सुरुवात करण्यात आधी आॅनलाईन जाचाला कंटाळून आत्महत्या करणारे चाळीसगाव तालुक्यातील देशमुखवाडी जि.प.शाळेतील शिक्षक आबासाहेब चौधरी (रा.पिंपळगावम्हाळसा)यांना श्रध्दांजली देण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिका, त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक, तरुण शिक्षक व सर्वात शेवटी जिल्हा शिक्षक समन्वयक समितीचे सदस्य अशाप्रकारे मोर्चाची रचना करण्यात आली. दुपारी १.३० वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानातून मोर्चाला सुरुवात झाली तर दुपारी २.४० वाजता हामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.  तब्बल एक तास चाललेल्या या मोर्चात शिक्षकांनी शिस्तीचे दर्शन घडविले. शिक्षकांनी टोप्या घालून त्यावर आपल्या मागण्या लिहिलेल्या होत्या. तर विविध फलकांवर देण्यात आलेल्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

महिलांच्या पंचमंडळाने दिले निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी पाकीजा पटेल, संगीता मगर, विद्यादेवी पाटील, छाया सोनवणे, अफशातरन्नुम खान या महिला शिक्षिकांच्या पंचमंडळाने जिल्हाधिकारी  किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले. यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे देखील उपस्थित होते.

अशा होत्या मागण्या १. शिक्षकांकडे दिलेली आॅनलाईनची कामे बंद करा व केंद्रस्तरावर डेटा आॅपरेटरची नेमणूक करण्यात यावी.२. २७ फेब्रुवारी २०१७ रोजीचा शिक्षक बदलीविषयक शासन निर्णयातील अन्यायकारक बाबींची दुरुस्ती करण्यात यावी.३. २३ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या निवड-वरिष्ठ श्रेणीबाबतच्या अन्यायकारक अटी रद्द करा.४ . १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करा.५.संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदतीत वाढ देण्यात यावी.६.शालेय पोषण आहारासह अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा व शिक्षकांना फक्त शिकवू द्या.