एरंडोल येथे गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:24 IST2019-03-06T00:23:46+5:302019-03-06T00:24:03+5:30

एरंडोल : येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून १ लाख एक हजार ७१० रुपये ...

Gurkha seized at Erandol | एरंडोल येथे गुटखा जप्त

एरंडोल येथे गुटखा जप्त

एरंडोल : येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून १ लाख एक हजार ७१० रुपये किमतीचा ९९३ पाकिटे गुटखा जप्त केला. याप्रकरणी २ दिवसांनी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन विजय भिका चौधरी (४३, रा. आनंद नगर एरंडोल), अनिल गंभीर भोई (३९, रा. भोई गल्ली एरंडोल) या दोघांना अटक करण्यात आली.
याबाबत एरंडोल पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर आत्माराम साळुंखे व पथकाने आनंदनगर व भोई गल्ली या दोन ठिकाणी छापा टाकला. त्यात ९९३ गुटख्याची पाकिटे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये ५ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विजय चौधरी व अनिल भोई यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी हे तपास करीत आहेत.
दरम्यान, या छाप्याप्रसंगी गुटख्यासोबत मोठी रक्कमही मिळून आली असे सांगितले जात असून त्याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: Gurkha seized at Erandol

टॅग्स :Jalgaonजळगाव