मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगावात जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:02 IST2020-01-01T12:56:31+5:302020-01-01T13:02:49+5:30
जळगाव : शिवसेनेचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर ...

मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगावात जोरदार स्वागत
जळगाव : शिवसेनेचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले.
पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्यांचे जळगावात आगमन झाले. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी मुंबईत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेवून आशीर्वाद घेतले.
बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचे गुलाबराव पाटील यांचे जळगावला आगमन झाले. शिवसेनेकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या वेळी सर्व तालुकाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील यांच्या स्वागतासोबतच शिवतीर्थ मैदानापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत मंगळवारी होणारी शिवसेनेची बैठक रद्द करण्यात आली होती. ती बैठक बुधवारी पद्मालय या शासकीय विश्रामगृहावर घेण्यात येणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत.