संकट मोचकांच्या मदतीला मुलुख मैदान तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:31 IST2019-04-11T12:30:02+5:302019-04-11T12:31:03+5:30

प्रारंभी गिरीश महाजन हे आक्रमक

Gulabrao patil help to girish mahajan | संकट मोचकांच्या मदतीला मुलुख मैदान तोफ

संकट मोचकांच्या मदतीला मुलुख मैदान तोफ

जळगाव - अमळनेरातील मेळाव्यात जलसंपदा मंत्री तथा ‘संकट मोचक’ गिरीश महाजन यांच्यावर ‘संकट’ येताच त्यांचे मित्र तथा खान्देशची मुलूख मैदान तोफ सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मदतीला धावले. प्रारंभी गिरीश महाजन हे आक्रमक होते. व्यासपीठावर येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी अक्षरश: खाली ढकलले... हात उगारला...कार्यकर्त्यांची धटींगशाही पाहून गुलाबराव तावातावाने पुढे आले... त्यांनी शड्डू ठोकत.... या रे स्टेजवर असे आव्हान द्यायला सुरूवात केली. यावेळी व्यासपीठासमोरील काही जण व गुलाबराव यांच्यात चांगलीच शाब्दीत चकमक उडाली. हे पाहून गिरीश महाजनही पुढे आले. दोघांचा रुद्रावतार पाहताच व्यासपीठासमोरील गर्दी मागे हटली... हा व्हीडीओदेखील व्हायरल झाला आहे.

Web Title: Gulabrao patil help to girish mahajan