गुलाबभाऊ... अधिकारीसले आता दनकाडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:14+5:302021-08-13T04:21:14+5:30
पालकमंत्री विकास योजनेबाबत जागृत आहेत, गेल्या ५० महिन्यांपासून या ११ कोटी खर्चाच्या योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे, २४ ...

गुलाबभाऊ... अधिकारीसले आता दनकाडाच
पालकमंत्री विकास योजनेबाबत जागृत आहेत, गेल्या ५० महिन्यांपासून या ११ कोटी खर्चाच्या योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे, २४ महिन्यांत हे काम पूर्ण व्हायला हवे होते. पण सरकारी कार्यालये एकमेकांना दोष देऊन आमचा काही दोष नाही, अशी भूमिका मांडतात, गावकऱ्यांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
अंजनी प्रकल्पातून ह्या योजनेचा उद्भव आहे, तेथे विहीर खोदली आहे, गावापर्यंत पाइपलाइन टाकली गेली आहे, जलकुंभ बांधून तयार आहेत, जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील तयार आहे, तरीदेखील गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही.
योगायोगाने पालकमंत्री हेच पाणीपुरवठामंत्रीदेखील आहेत, ते आज कासोदा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यांच्या कासोदा दौऱ्यामुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
देवनाबी पानी येत नई, आनी योजना मझारथून बी पेवाले पानी भेटत नई. गुलाबभू, दनकाळा हो या अधिकारीसले अशी आर्त हाक गुलाबराव पाटील यांना कासोदा ग्रामस्थांनी दिली आहे.
ठेकेदार, जीवनप्राधिकरण विभाग व वीज कार्यालय हे सर्व संबंधित आमचा काहीही दोष नाही असा वेळोवेळी खुलासा करून एकमेकांचा दोष दाखवून अंग झटकण्याच्या वृत्तीमुळे ५० हजार लोकसंख्येला योजना असून पिण्याचे पाणी मिळू नये याबाबत येथे संताप व्यक्त होत आहे.