Guide to the 'Study Preparation' by InnerVeal | इनरव्हीलतर्फे ‘अभ्यासाची तयारी’ विषयावर मार्गदर्शन
इनरव्हीलतर्फे ‘अभ्यासाची तयारी’ विषयावर मार्गदर्शन

भुसावळ, जि.जळगाव : इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ आयोजित ‘तयारी अभ्यासाची’ या विषयावर समर्थसिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती देव, राजेश्री कात्यायणी, सी.सी.अलका भटकर, सुनंदा भारुळे उपस्थित होत्या.
अभ्यासाची तयारी करण्यासाठी सोप्या युक्त्या वापराव्यात. पाठांतर न करता जास्तीत जास्त स्मरणात कसे ठेवायचे ही पद्धत समर्थसिंग यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
स्वाती देव म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यायला हवा. ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय पाटील यांनी, तर आभार अलका भटकर यांनी मानले.
 

Web Title: Guide to the 'Study Preparation' by InnerVeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.