ई-वे बिल सुटसुटीत व व्यापाऱ्यांच्या सोयीचे, जळगावात राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:18 PM2018-03-28T12:18:47+5:302018-03-28T12:18:47+5:30

प्रशिक्षण

Guidance on e-way Bill | ई-वे बिल सुटसुटीत व व्यापाऱ्यांच्या सोयीचे, जळगावात राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने मार्गदर्शन

ई-वे बिल सुटसुटीत व व्यापाऱ्यांच्या सोयीचे, जळगावात राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने मार्गदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्दे१ एप्रिलपासून ई-वे बिलाची अंमलबजावणीई-वे बिल प्रक्रिया सध्या केवळ आंतरराज्य

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - ई-वे बिल या प्रणालीमुळे माल वाहतुकीची प्रक्रिया अधिक सोपी होणार असून यामुळे व्यापारी, वाहतूकदारांचे काम सुटसुटीत होणार आहे, असा सल्ला राज्य कर सहायक आयुक्त शरद पाटील यांनी दिला.
१ एप्रिलपासून ई-वे बिलाची अंमलबजावणी होत असून या संदर्भात २७ मार्च रोजी राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्यावतीने सीए, व्यापारी, वाहतूकदार यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
देशभरात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी आता ई -वे बिल ही प्रणाली अंमलात येत आहे. या विषयी यापूर्वीही व्यापा-यांना मार्गदर्शन करण्यात आले असून याबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी मंगळवारी राज्य कर सह आयुक्त दीपक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यास सीएस, व्यापारी बांधव, वाहतूकदार उपस्थित होते.
या प्रशिक्षणदरम्यान शरद पाटील यांनी सविस्तर माहिती देताना वाहतुकीच्या प्रकारानुसार स्पष्टीकरणही केले. ई-वे बिल प्रक्रिया सध्या केवळ आंतरराज्य (एका राज्यातून दुस-या राज्यात माल वाहतुकीसाठी) व्यापारासाठी लागू राहणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
चालकासोबत या गोष्टी आवश्यक
माल वाहतूक करताना चालकासोबत कराची पावती, ई-वे बिलाची प्रिंंट अथवा किमान त्याचा क्रमांक आवश्यक राहणार असल्याचे सांगण्यात आले.
तपासणीबाबत तरतुदी
माल वाहतूक करताना राज्याच्या सीमेवर माल तपासणी करणाºया पथकाकडून ई-वे बिलाचा क्रमांक तपासला जाणार आहे. या सोबतच आवश्यक कागदपत्रे चालकासोबत आहे की नाही याची पाहणी करण्यासह वाहनातील मालाची तपासणी पथक करू शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली.
...तर दंडाची आकारणी
मालाची वाहतूक करताना बिल अथवा क्रमांक सोबत आहे, मात्र बिलात नमूद रकमेपेक्षा जास्त माल आढळल्यास त्यावेळी दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली. हा दंड कराच्या १०० टक्के असू शकतो, असेही त्यांनी सांगितले. या सोबतच मालक स्वत:हून पुढे आला अथवा नाही आला तर किती दंड लागू शकतो, याचेही स्पष्टीकरण त्यांनी केले.
या सोबतच अपघात झाला, दंगल झाली अथवा कोणत्याही कारणामुळे वाहतुकीस अडथळा आला तर त्याविषयी असलेल्या तरतुदी, माल परत केला तर त्यासाठी काय तरतूद आहे, या विषयीदेखील शरद पाटील यांनी माहिती दिली.

Web Title: Guidance on e-way Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.