पालकमंत्री मोबाईलवर, विमान धावपट्टीवरच : जळगावात आठ मिनिटे ताटकळले विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:38 IST2018-03-30T23:38:52+5:302018-03-30T23:38:52+5:30
विमानात चढताना अचानक खणखणला मोबाईल

पालकमंत्री मोबाईलवर, विमान धावपट्टीवरच : जळगावात आठ मिनिटे ताटकळले विमान
विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३० - जळगाव जिल्ह्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ करून परतण्यासाठी विमानतळावर पोहचलेल्या महसूल मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोबाईल अचानक खणखणला आणि आठ मिनिटे पाटील हे मोबाईलवर बोलत राहिल्याने विमान धावपट्टीवरच थांबून होते.
दुपारी ४.१० वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विमानतळावर पोहचले. तेथे व्हीआयपी चेंबरमध्ये काही वेळ बसून मंत्र्यांचा ताफा धावपट्टीवर पोहचला. तेथे चंद्रकांत पाटील वगळता सर्व जण विमानात बसले. मात्र चंद्रकांत पाटील यांचा मोबाईल अचानक खणखणला आणि ते मागे वळून विमानाच्या समोर जाऊन मोबाईलवर बोलत होते. बोलता बोलता ते विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ आले व पुन्हा माघारी परतून मोबाईल बोलू लागले. बोलणे आटोपल्यानंतर दुपारी ४.३० वाजता विमानाने उड्डाण घेतले व अधिकारी, पदाधिकारीही माघारी परतले.