गणपती संकलन केंद्राची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:39 IST2020-08-31T20:39:28+5:302020-08-31T20:39:39+5:30
जळगाव : शहरातील काव्यरत्नावली चौकात शहरातील सर्वात मोठे गणपती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहे़ या केंद्राचे सोमवारी जिल्ह्याचे ...

गणपती संकलन केंद्राची पालकमंत्र्यांकडून पाहणी
जळगाव : शहरातील काव्यरत्नावली चौकात शहरातील सर्वात मोठे गणपती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहे़ या केंद्राचे सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली.
याप्रसंगी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, नगरसेवक अमर जैन, पियुष हसवाल, अनिमेश मुंदडा, ऋषिकेश जाखेटे, दर्शन भावसार, उपस्थित होते. त्याठिकाणी सजविलेले दोन ट्रक व ३ ट्रॅक्टर यांच्यासह केंद्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली़ सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौकात गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे.